भजनी मालिका
← भजनांकडे परत

मन आधी मुंडी वासनेते खंडी

man adhi mundi vasanete khandi

रचनाकार: संत सोपान · अभंग
मन आधी मुंडी वासनेते खंडी । विद्ठल ब्रह्मांडी एक आहे ॥ १॥ मन हे सोवळे सदा शौच करी । तुज निरंतरी हरि पावे ॥२॥ विवेक वैराग्य ज्ञानाचे सौभाग्य । सोवळा आरोग्य हरि देख ॥३।। सोपान नेणे सलगीचा सोवळा । त्याने वेळोवेळा स्मरे हरि ॥४॥