भजनी मालिका
← भजनांकडे परत

माळियांचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा

maliyanche vanshi sanvata janmala | pavan to kela vansh tyacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माळियांचे वंशी सांवता जन्मला । पावन तो केला वंश त्याचा ॥१॥ त्यासवें हरी खुरुपूं लागे अंगें । धांउनी त्याच्या मागें काम करी ॥२॥ पीतांबर कास खोवोनी माघारी । सर्व काम करी निजसंगें ॥३॥ एका जनार्दनीं सांवता तो धन्य । तयाचें महिमान न कळे कांहीं ॥४॥