भजनी मालिका
← भजनांकडे परत

माजीं बांधावा भोपळा । तैसी बांधू नये शिळा ।। .

majin bandhava bhopala | taisi bandhu naye shila || .

रचनाकार: संत रामदास · अभंग
माजीं बांधावा भोपळा । तैसी बांधू नये शिळा ।। . घेऊं येतें तेंचि घ्यावें । येर अवघेंचि सांडावें ।। विषयवल्ली अमरवल्ली । अवघीं देवेचि निर्मिली ।। अवघें सृष्टीचें लगट । करुं नये कीं सगट ।। अवघें सगट सारिखेंची । वाट मोडली साधनाची ।। आवघेचि देवे केलें । जें मानेल तेंचि घ्यावें ।। दास म्हणे हरिजन । धन्य जाणते सज्जन ।।