भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी जनार्दन माउली । प्रेमपान्हा पान्हावली

majhi janardan mauli | premapanha panhavali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझी जनार्दन माउली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥ तीच नित्य मज सांभाळी रात्रंदिवस सर्वकाळीं ॥२॥ आठवितों वेळोवेळां माझा तिजलागीं कळवळा ॥३॥ एका जनार्दनीं बाळ । माता रक्षीं पैं स्नेहाळ ॥४॥