भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझी दत्त माऊली । प्रेमपान्हा पान्हावली

majhi datta mauli | premapanha panhavali

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझी दत्त माऊली । प्रेमपान्हा पान्हावली ॥१॥ कुर्वाळुनी लावी स्तनीं । नोहे निष्ठुर क्रोध नाहीं मनीं ॥२॥ भक्तांसी न विसंबे । सदा वाट पाहे बिंबे ॥३॥ एका जनार्दनीं निश्चित । दत्तनामें पावन पतीत ॥४॥