भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें माझें म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिलें फलकट

majhen majhen mhanoni karitosi kashta | udala to hans rahilen phalakat

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझें माझें म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिलें फलकट ॥१॥ तनांचें बुजवणें तैशी देहस्थिती । चित्ता अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥ स्वजन स्वगोत्र सारे करती विचार । काढा काढा म्हणती जाला भूमीभार ॥३॥ देहाची जनकें केवळ मातापिता । गेला गेला म्हणती तोचि देह असतां ॥४॥ अष्टही प्रहर भोगी देह गेह वित्त । सेजेची भार्या पळे म्हणे भुतभूत ॥५॥ यापरी जाणोनी सांडी देहाची खंती । एका जनार्दनीं राहिला विदेह स्थिती ॥६॥