भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझें देईं मजलागुन । म्हणोनि दृढ धरिले चरण

majhen dein majalagun | mhanoni drudh dharile charan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझें देईं मजलागुन । म्हणोनि दृढ धरिले चरण ॥१॥ भक्तीचें ऋण देवा । देई माझें मज केशवा ॥२॥ माझें देतां जड काई । अभिलाषेंक धरीन पायीं ॥३॥ एका अभिलाषें फावला । एका जनार्दनीं उभा केला ॥४॥