भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा वडिलांचे दैवत । कृपाळु हा पंढरीनाथ

majha vadilanche daivat | krupalu ha pandharinath

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझा वडिलांचे दैवत । कृपाळु हा पंढरीनाथ ॥१॥ पंढरीसी जाऊं चला । भेटुं रखुमाईविठ्ठला ॥२॥ पुडलिकें बरवें केलें । कैसें भक्तीनें गोविलें ॥३॥ एका जनार्दनीं नीट । पायी जडलीसे वीट ॥४॥