भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा नामा जंव नांवरूपा आला जंब म्हणों लागला घरदार

majha nama janv nanvarupa ala jamb mhanon lagala gharadar

रचनाकार: संत गोणाई · अभंग
माझा नामा जंव नांवरूपा आला जंब म्हणों लागला घरदार ||१|| तब कैसें विघ्न उठिलें गे माये। नामा पंढरिरायें भुलविला ||२|| सांग बा विठ्ठला म्यां काय केलें । नामया कां मुलविलें कवण्या गुणें ॥३॥ आम्ही गा सिंपिये अनायें में दीनें करूं सिवने टिपणें पोट भरूं।।४।। त्यासी देवा तुवां आणियेला क्षयो। कैंचा आम्हां देवो निर्मिलासी ॥५॥ असतां चराचर न बुडतां हे सृष्टी कां गा घेसी पाठी दुर्बळीची ॥६॥ एक बाळ माझें धरिली त्याची आस । त्यां कैसी निराश मांडियेली ||७|| दिसां मासां गर्म जाणोनियां पोटीं । त्याची आस मोठी करिती लोक।।८।। एवढा माझा नामा कैसेन विसरेन। देई कृपादान दुर्बळासी ॥९॥ तूं अनाथा गोसावी दीनाचा कैवारी । तें ब्रीद श्रीहरी काय जालें ||१०|| बिघडलें पाडस करी एके ठायीं । विनवितें गोणाई केशिराजा ।।११।।