भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा भक्त मज भीतरीं । मी स्वयें असे तया माझारीं

majha bhakta maj bhitarin | mi svayen ase taya majharin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझा भक्त मज भीतरीं । मी स्वयें असे तया माझारीं ॥१॥ बहु बोलाचें नाहीं कारण । मी देह तो आत्मा जाण ॥२॥ माझिया भक्तिसी जे लागले । ते तीच होउनी ठेले ॥३॥ एकाजनार्दनीं अभेद । तया हृदयीं मी गोविंद ॥४॥