भजनी मालिका
← भजनांकडे परत

माझा भक्त मज अंतरीं । मी सदा बाहेरी तिष्ठतसें

majha bhakta maj antarin | mi sada baheri tishthatasen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
माझा भक्त मज अंतरीं । मी सदा बाहेरी तिष्ठतसें ॥१॥ ऐशी परस्परें खूण । जाणती तें ब्रह्माज्ञान ॥२॥ माझी सायुज्यता मुक्ति । घेउनी बळें मीच होती ॥३॥ सायुज्यापरीस भक्ती गोड । एका जनार्दनीं धरिती चाड ॥४॥