भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज तों सांभाळिलें संती । धरिलें हातीं दीन म्हणुनी

maj ton sambhalilen santi | dharilen hatin din mhanuni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मज तों सांभाळिलें संती । धरिलें हातीं दीन म्हणुनी ॥१॥ सांगतां नये विश्वास लोकां । बाधी अशंका ज्याची त्या ॥२॥ मी तों बोलें त्याचिया सत्ता । पुढें विचारितां कळेल ॥३॥ निळा म्हणे जुनाट नाणें । नव्हे हें उणें पारखितां ॥४॥