भजनी मालिका
← भजनांकडे परत

मज तो आणिक नाहीं चाड । येवढी जोड पायांची

maj to anik nahin chad | yevadhi jod payanchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मज तो आणिक नाहीं चाड । येवढी जोड पायांची ॥१॥ वास द्यावा पंढरीचा । संतांचा समागम ॥२॥ कीर्तनीं नाचेन महाद्वारी । गरुडपारी कान धरुनी ॥३॥ ऐसें लडीवाळ तान्हें । एका जनार्दनें पोसणें ॥४॥