भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें संतें सांगितलें । तें हें आलें फ़ळासी

magen santen sangitalen | ten hen alen फ़lasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागें संतें सांगितलें । तें हें आलें फ़ळासी ॥१॥ जावें शरण विठोबासी । मग सुखासी काय उणें ॥२॥ करावें व्रत एकादशी । द्वादशी क्षीरापती सेवन ॥३॥ नेमें जावें पंढरीसी । तेणें चौर्‍यांयशी चुकती ॥४॥ एका जनार्दनीं हेचिं सार । वाया भार कासया ॥५॥