भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागें बहुतां गुणा आलें । रामनाम रसायन चांगलें

magen bahutan guna alen | ramanam rasayan changalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागें बहुतां गुणा आलें । रामनाम रसायन चांगलें ॥१॥ बहुतीं सेविलें आदरें । तेणे तरलें भवसागर ॥२॥ शुकें उतरिलें निगुती । दिधलें असे परिक्षिती ॥३॥ सेवितां आरोग्या झाला । एका जनार्दनीं म्हणे भला ॥४॥