भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागतां कवतुक । दीन होऊनी रंक । दारोदारीं भीक । मागें धांवे

magatan kavatuk | din houni rank | darodarin bhik | magen dhanve

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागतां कवतुक । दीन होऊनी रंक । दारोदारीं भीक । मागें धांवे ॥१॥ मग ते करी काय । पाठी देउनी पाय । रसातळीं पाहे । घालूं धावें ॥२॥ मागों जातां पुढें । मायेचें काढी मढें । उकसाबुकसी रडे । माये माये म्हणोनी ॥३॥ फ़रश घेउनी करीं । ज्यातें त्यातें मारी । रक्तें रक्त उरी । परि देणें नाहीं ॥४॥ मागतां रोकडें । एका जनार्दनीं सांकडें । मेळवोनि माकडें । पाठीं लागे ॥५॥