भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागतां देखोनि दिठी । हातपाय घालूनि पोटीं । पर्वत पडिल्या पाठीं । देणॆं नाहीं

magatan dekhoni dithi | hatapay ghaluni potin | parvat padilya pathin | denen nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मागतां देखोनि दिठी । हातपाय घालूनि पोटीं । पर्वत पडिल्या पाठीं । देणॆं नाहीं ॥१॥ मागतां न देसी । दांतीं भोये धरिसी । पांढरा डुकर होसी । तेणें कर्में ॥२॥ ठेवणें न देंतां । जावों नेदी सर्वथा । बळीचिया ऎसा आतां । बांधीन पायीं ॥३॥ मागत निजनिर्धार । खांबामाजी तूं गुरगुरी । तिखट नखें बोचकरी । क्रोधें करुनी ॥४॥ एका जनार्दनीं त्यातें । माग त्याच्या बापातें । फ़ाडोनी आतें । ठेविलें निश्चितें देणें नाहीं ॥५॥