भजनी मालिका
← भजनांकडे परत

मागण्याची न करुं गोष्टीं । तुम्हां पोटीं भय वाटे

maganyachi na karun goshtin | tumhan potin bhay vate

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मागण्याची न करुं गोष्टीं । तुम्हां पोटीं भय वाटे ॥१॥ नामचि तुमचें पुरे देवा । न करुं हेवा आणिक ॥२॥ माझें आहे स्वाधीन मन । न इच्छी मान धन कांहीं ॥३॥ निळा म्हणे सत्य साचा । हाचि संकल्पाचा निर्धार ॥४॥