भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग वस्त्रें देउनी गौरविला । रायें बहूत सन्मानिला । चालतां मार्गी विचार सुचला । म्हणे टाकवीन तान्हुला निर्जनी

mag vastren deuni gauravila | rayen bahut sanmanila | chalatan margi vichar suchala | mhane takavin tanhula nirjani

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग वस्त्रें देउनी गौरविला । रायें बहूत सन्मानिला । चालतां मार्गी विचार सुचला । म्हणे टाकवीन तान्हुला निर्जनी ॥१॥ टिळे माळा टोपी शिरीं । श्रीमुद्रांची वोळी पंचांग करी । धोकटी घेउुनीयां खादियावरी । शुध्द मुहूतें चालिला ॥२॥ आला गोकुळासन्निधीं । शुध्दाचमन केलें विधी । मनी कापटयाची बुध्दी । साक्षी तियेचा परमात्मा ॥३॥ नंदगृही प्रवेशला । येतां यशोदेनें देखिला । पाट बसावया दिधला । पाट बसावया दिधला । नमूनि पूजिला उपचारी ॥४॥ स्वस्थ स्वस्थानीं बैसले । पंचाग काढूनियां उकलिलें । वाचुनी चंद्रबळ दाविलें । आणि दिधले आशिर्वादा ॥५॥ मग पुसे यशोदेप्रती । प्रसूतिकाळ कोणती तिथी । तंव ते आणूनियां श्रीपती । व्दिजातें दाखवी उल्हासे ॥६॥ देखतांचि तो मदनमूर्तीं । ठकल्या ठेल्या इंद्रियवृत्ती । निळा म्हणे समाधिस्थिती । पावली प्रतीति ब्राम्हणां ॥७॥