भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग सांगें गुह्य गोष्टी । मामा पाचारितो भेटी । इतुकेंचि ऐकोनियां पोटीं । कृष्णा आनंद न समाय

mag sangen guhya goshti | mama pacharito bheti | itukenchi aikoniyan potin | krushna anand na samay

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग सांगें गुह्य गोष्टी । मामा पाचारितो भेटी । इतुकेंचि ऐकोनियां पोटीं । कृष्णा आनंद न समाय ॥१॥ मग म्हणे बळिरामासी । जाऊं मामाचिये भेटीसी कृप करुनियां अक्रूरासी । मूळ आम्हांसी पाठविला ॥२॥ म्हणती बळिरामही चलावें । वोरसें मामासी भेटोनी यावें । आपणंसिही जिवें भावें । आर्त तयाचें अखंड ॥३॥ घेऊनि पांचशें गोवळ । समागमें आपुलें दळ । निघते झाले उतावेळ । आले घरासी पुसावया ॥४॥ मग नंदयशोदेप्रती । उभयतांहि नमस्कार करिती । मामासी भेटी जाऊं म्हणती । दयावी आज्ञा आशिर्वादें ॥५॥ तें म्हणती कंस व्देषी । महादृष्ट पापराशी । देखतांचि घेरतील रे दोघासीं । सर्वथा तेथें न जावें ॥६॥ निळा म्हणे ऐकोनि हरि । म्हणे न चिंतावें हें अंतरीं । आम्हांसी आप्त या संसारीं । कोण मामाहुनी जिवलग ॥७॥