भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग म्हणे गिळिले गोप । गाई खिल्लारांचे कळप । तारि हा चिरुनियां सांडीन सर्प । घेईन सूड या सकळांचा

mag mhane gilile gop | gai khillaranche kalap | tari ha chiruniyan sandin sarpa | ghein sud ya sakalancha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग म्हणे गिळिले गोप । गाई खिल्लारांचे कळप । तारि हा चिरुनियां सांडीन सर्प । घेईन सूड या सकळांचा ॥१॥ कृष्ण शिरतीं त्याच्या वदनी । अधासुरा हर्ष न समाय मेदिनी । म्हणे कार्य साधिलें हा चक्रपाणी । गिळिलियावरी सर्व माझे ॥२॥ ऐसा आनंदला अघ । तंव लाघविया श्रीरंग । वाढला पाताळवरी स्वर्ग । नेदी जाभाडी मेळवूं त्या ॥३॥ नुगळवेचि तो उगळूं जातां । पुढेहि न चलेचि तत्वतां । फाडूनि वदन केल्या चळथा । व्दिभाग करुनि सांडियेले ॥४॥ तेणें उघडया पडल्या गाई । गोवळ म्हणती थोर नवाई । निमिषमात्रेंचि गेली धुई । पहारे स्मरणांचे खेवा । देखिला श्रीहरी दृष्टिपुढें ॥६॥ निळा म्हणे सांगती नवल । आजी अंधारिमाजी गाई गोवळ । पडिले होते आणि वायो प्रबळ । माघारेंही सरों नेदी ॥७॥