भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग म्हणे गडियां आपण । उचलूं चला गोवर्धन । तयातळीं सकळही जन । घालुनियां संरक्षूं

mag mhane gadiyan apan | uchalun chala govardhan | tayatalin sakalahi jan | ghaluniyan sanrakshun

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग म्हणे गडियां आपण । उचलूं चला गोवर्धन । तयातळीं सकळही जन । घालुनियां संरक्षूं ॥१॥ मग ते उभे करुनि फेरी । धरविला त्यांचे हातें गिरी । आपणही तेथें निमित्यावरी । एकी आंगोळी लावियली ॥२॥ हाका देऊनि उचलीती । येकचि हिल्लारी करा म्हणति । उर मस्तक नेटीं लाविती । एक पाठी देती निजबळें ॥३॥ एक पडोनियां उचलिती पाय । एक म्हणती न धरा रें भय । एक उभे राहती ठायाठाय । कृष्ण बळिया आमुचा ॥४॥ तंव तो अनंतकोटीब्रम्हांडाधीश । परमात्मा हा कृष्ण परेश । विश्रवलाघवी परमपुरुष । न करी तें काय स्वलीला ॥५॥ आपोआप चालिला वरी । अंतरिक्षाची निज सत्ता गिरी । धरुनि सकळांते हाकारी । म्हणे वसा तळीं याचीये ॥६॥ आपभयेंचि धांवलीं सकळें गाई गौळणी आणि गोवळे । निळा म्हणे श्रवापदें पक्षीकूळें । मुंगीया आदीकरुनी ॥७॥