भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग म्हणती अवघ्या जणी धांवोनि पहागे आणा पाणी । डास वरखडला न्याहाळुनी । रक्त कोठुनी स्त्रवलें हो

mag mhanati avaghya jani dhanvoni pahage ana pani | das varakhadala nyahaluni | rakta kothuni stravalen ho

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग म्हणती अवघ्या जणी धांवोनि पहागे आणा पाणी । डास वरखडला न्याहाळुनी । रक्त कोठुनी स्त्रवलें हो ॥१॥ पहाती तंव तो उत्तम अंगे । जेंवि का उठियलें अनंगे । नभापरी अलिप्त संगे । काय करिती अघात त्या ॥२॥ नानापरिंची अक्षवाणें । करी यशोदा वांदी दानें । यथाविधी व्दिजभोजनें । केलें जिताणें श्रीहरीचें ॥३॥ म्हणती नवीची रिठियाची माळा । घातली होती त्वां याचिया गळां । ते काय झाली गे याची वेळा । तेंचि अरिष्ट यासी होतें ॥४॥ ऐसा झाला घोषगजर । ऐकोनियां तो कंसासुर । म्हणे बोळविला महावीर । केला चकाचुर रिठाही ॥५॥ करितां उपाय न चले यासी । कंस भयाभीत मानसीं । म्हणे काळ हा जन्मला आम्हांसी । करील संहार काळाचा ॥६॥ निळा म्हणे न चले युक्ती । यापुढें कापटया समाप्ती । सर्वांतरवासी हा श्रीपती । कर्मफळदाता निजसत्तें ॥७॥