भजनी मालिका
← भजनांकडे परत

मग होसोनियां बोलिजे कृष्णें । बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे । सर्पे गिळिले होतेती प्राणें । कैसे तरी वांचलेती

mag hosoniyan bolije krushnen | bete ho tumhi avaghechi shahane | sarpe gilile hoteti pranen | kaise tari vanchaleti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मग होसोनियां बोलिजे कृष्णें । बेटे हो तुम्ही अवघेचि शहाणे । सर्पे गिळिले होतेती प्राणें । कैसे तरी वांचलेती ॥१॥ बरें झालें हातों मागें । तेणें वांचलेतीरे प्रसंगे । पैल पहारे महाभुजंगे । चिरुनी सांडिला त्याच्या फाळी ॥२॥ पहाती तंव भरोनियां दरा । पडिला वाहती शोणित धारा । म्हणती दाऊं वडिलांतें नवल हें ॥४॥ ऐंसा अघासुर मर्दिला । कृष्णें पवाडा हा केला । गोवळ नाचती विजयी झाला । श्रीहरी आला आमुच्या सांगाती ॥५॥ कंसातेंहि विदित झालें । जाउनी वार्तिकीं सांगितलें । तेणें चपपक त्याचें गेंलें । म्हणे ओढवलें दुर्मरण ॥६॥ निळा म्हणे इकडे गाई । चरतां फांकल्या दिशा दाही । वळत्या करुनियां त्या लवलाही । आणिल्या वृंदावनासमीप ॥७॥