भजनी मालिका
← भजनांकडे परत

मधुपर्कादिक नावडे पूजन । आवडे कीर्तन भाविकांचें

madhuparkadik navade pujan | avade kirtan bhavikanchen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मधुपर्कादिक नावडे पूजन । आवडे कीर्तन भाविकांचें ॥१॥ शंखचक्रादिक नावडती मनीं । वोडवितसे पाणी भाजीपाना ॥२॥ लक्ष्मीसारखी नावडती जीवा । आवडे या देवा तुळशी बुक्का ॥३॥ एका जनार्दनीं कीर्तनीं नाचे । आणिक सुख त्याचे नये मना ॥४॥