भजनी मालिका
← भजनांकडे परत

मच्छ कच्छ वराह झाला । खुजाहि शोभला विक्राळ

machchha kachchha varah jhala | khujahi shobhala vikral

रचनाकार: संत निळोबा · अभंग
मच्छ कच्छ वराह झाला । खुजाहि शोभला विक्राळ ॥१॥ भक्तप्रिय प्रियोत्तम । सदा अविश्राम दासाविशीं ॥२॥ फरशधारी धनुर्धर । स्वरुप सुदंर गोपवेषीं ॥३॥ निळा म्हणे बौध्य कलंकी । धरी नेटकीं रुपें ऐसीं ॥४॥