भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेकुरें खेळतीं वो साचें । मायबाप प्रेमें नाचे

lekuren khelatin vo sachen | mayabap premen nache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लेकुरें खेळतीं वो साचें । मायबाप प्रेमें नाचे ॥१॥ तैसा हेत पांडुरंगीं । धरितां उणें काय जगीं ॥२॥ जैसा जैसा छंद त्याचा । पुरवणें लागें साचा ॥३॥ एका जनार्दनाचा बाळ । कौतुकें खेळतसें खेळ ॥४॥