भजनी मालिका
← भजनांकडे परत

लेकुराची आळी मायबापापुढें। पुरवी लाडे कोडे लळे त्याचें

lekurachi ali mayabapapudhen| puravi lade kode lale tyachen

रचनाकार: संत सेना · अभंग
लेकुराची आळी मायबापापुढें। पुरवी लाडे कोडे लळे त्याचें ॥१॥ करावा सांभाळ सर्वस्वी गा आतां । कांहो अव्हेरितां जवळीचा ॥२॥ आम्हांवरी चाले सत्ता आणिकांची। थोरीव तुमची काय मग ॥३॥ आला सेना न्हावी पायांपें जवळी । आतां टाळाटाळी नकां करूं ॥४॥