भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावूनियां नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत ह्रदयामाजीं

lavuniyan netra sada samadhistha | athavi anant hradayamajin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लावूनियां नेत्र सदा समाधिस्थ । आठवी अनंत ह्रदयामाजीं ॥१॥ नाहीं देहावरी रुपीं जाहला मग्न । नाचे उडे पूर्ण विठ्ठलनामें ॥२॥ अज्ञान तें बाळ धरित तें पायां । चित्त देवराया समरसलें ॥३॥ एका जनार्दनीं नाचतां समरसें । बाळ पायांसरसें चिखलीं आलें ॥४॥