भजनी मालिका
← भजनांकडे परत

लावोनि भवभयें तुवां केलें साचें। देह नव्हे याचें ऐसें केलें

lavoni bhavabhayen tuvan kelen sachen| deh navhe yachen aisen kelen

रचनाकार: संत गोणाई · अभंग
लावोनि भवभयें तुवां केलें साचें। देह नव्हे याचें ऐसें केलें ॥१॥ सुखभोग सर्व दिला टाकोनियां नेणें तुझ्या पायांपरतें कांहीं ॥ २॥ ऐसें काय केलें नामया चाळविलें । समूळ बुडविलें अपणांमाजीं ॥३॥ आम्हां दुर्बळांचा करोनियां घात केला वाताहात घराचार ||४|| आतां तुजविण कोणाचें साउली। पाळली पोसिली तुझी सेवा ॥५॥ संकटीं उदरीं वाहिली म्यां आशा होता भरवसा थोर याचा ॥६॥ तंव तुवां लाविला आपुलिया सर्वे नव्हे मज कांहीं ऐसा केला||७|| काया वाचा मनें सांडोनियां मज अनुसरला तुज मनोभावें ||८|| नकळे तुझी माव काय या दाविलें परतेनासें केलें चित्त याचें ।।९।। आतां माझा शीण निवारिल कोण । एका तुजविण पांडुरंगा।।१०।। गोणाई म्हणे देवा देई जीवदान सुखाचें निधान नामा माझा ।। ११॥