भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाजविली सेवा लाजाविली भक्ति । वैराग्य विरक्ति लाजविली

lajavili seva lajavili bhakti | vairagya virakti lajavili

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लाजविली सेवा लाजाविली भक्ति । वैराग्य विरक्ति लाजविली ॥१॥ ऐसाचि घडोनि आला हा प्रसंग । हांसविलें जग आपुल्या ब्रीदा ॥२॥ आमुचें होणार तेंचि वाढविलें । तुमचें कीर्ति आलें हीनपण ॥३॥ कैसे दीनानाथ म्हणवाल जी आतां । आम्हां उपोक्षितां अनाथांसी ॥४॥ शिणलों भागलों संसारें गांजिलों । म्हणोनियां आलों शरण तुम्हां ॥५॥ निळा म्हणे काय जाणोनि नेणते । झालेति यशातें दवडूनियां ॥६॥