भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाहो करा लाहो करा । वाचे स्मरा विठ्ठल

laho kara laho kara | vache smara viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लाहो करा लाहो करा । वाचे स्मरा विठ्ठल ॥१॥ तुटेल बंधन उपाधी । बाधों न शके आधीव्याधी ॥२॥ न लगे खटपट पसारा । वाचे विठ्ठल उच्चार ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । विठ्ठल म्हणतां नुरतीं पापें ॥४॥