भजनी मालिका
← भजनांकडे परत

लगोरिया मांडूनि पोरा वांटशील गडी । निर्बळाच्या संगे डाव देतां येसी रडी

lagoriya manduni pora vantashil gadi | nirbalachya sange dav detan yesi radi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लगोरिया मांडूनि पोरा वांटशील गडी । निर्बळाच्या संगे डाव देतां येसी रडी ॥१॥ न करीं ऐसें आतां । करीं गडी श्रीअनंता ॥२॥ मारितांचि लगोया आधीं येतो हाता डाव । चुकलिया व्याहाण वाटी हांसतात सर्व ॥३॥ निळा म्हणे वांयांविण नको पावों खेदा । याचिलागीं न विसंगे श्रीहरि गोविंदा ॥४॥