भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाडिके विठोबाचे आम्हीं । गाऊं नित्यनेमीं नाम तुझें

ladike vithobache amhin | gaun nityanemin nam tujhen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
लाडिके विठोबाचे आम्हीं । गाऊं नित्यनेमीं नाम तुझें ॥१॥ उत्तम उत्तम साधन हें नाम । गांता प्रेम वाटे जीवीं ॥२॥ न कळेचि वेदां उपनिषद्‌बोधा । त्या हरि गोविंदा लगे आम्हीं ॥३॥ एका जनार्दनीं मंगळा मंगळ । न लगे आम्हां मोल उच्चारितां ॥४॥