भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनानंद चारी मुक्ती । धांवत येती घरासी

kirtananand chari mukti | dhanvat yeti gharasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनानंद चारी मुक्ती । धांवत येती घरासी ॥१॥ सोपें सार सोपें सार । कीर्तन उच्चार कलीयुगीं ॥२॥ वाहतां टाळीं कीर्तनछंदें । जाती वृंदे पातक ॥३॥ एका विनटला कीर्तनीं । भुक्तिमुक्ति लागतीं चरणीं ॥४॥