भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव नामा म्हणे उच्चारा नाम

kirtanacha gajar hot anandane | tanv nama mhane uchchara nam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तनाचा गजर होत आनंदाने । तंव नामा म्हणे उच्चारा नाम ॥१॥ टाळी बाहुनी होतें मुखीं वदा नाम । ऐकतां सकाम भक्त जाहले ॥२॥ गोरियाचे मना संकोच वाटला । कर नाहीं आपुल्याला टाळी वाहतां ॥३॥ वाटलेंसे दु:ख नयनीं नीर आलें । एका जनार्दनीं बोले नाम मुखीं ॥४॥