भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा

kirtan shreshtha kaliyugin seva | tarale pataki te deva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कीर्तन श्रेष्ठ कलियुगीं सेवा । तरले पातकी ते देवा ॥१॥ वाल्हा तारिला कीर्तनीं । पावन जाला त्रिभुवनीं ॥२॥ गणिका कीर्तनें तरली । मोक्षधामा ती नेली ॥३॥ अजामेळ चोखा महार । कीर्तनीं तरले अपार ॥४॥ एका जनार्दनीं कीर्तन । तिन्हीं लोक जाले पावन ॥५॥