भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळों कोलकाठी पुढें धांवसील वेगें । वारुनि वरिच्या वरि राखो नेणसी तूं आंगे

khelon kolakathi pudhen dhanvasil vegen | varuni varichya vari rakho nenasi tun ange

रचनाकार: संत निळोबा · अभंग
खेळों कोलकाठी पुढें धांवसील वेगें । वारुनि वरिच्या वरि राखो नेणसी तूं आंगे ॥१॥ आतां खेळ कोलकाठी । रे गोपाळ धरुनि दृष्टी ॥२॥ राखों जातां दांडे सिवताती आग । नावरती तुज तरी वाउगेचि सोंग ॥३॥ निळा म्हणे वस्तादा करि नंदाचा नंदन । तोचि देईल विदया तुज करील प्रवीण ॥४॥