भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळी खेळता वो विकळ सुंदरा । जालि आठविता नंदाच्या कुमारां । स्वेद कंपखेद दाटला शरिरा । जाला विरह तो नेणती इतरा वो

kheli khelata vo vikal sundara | jali athavita nandachya kumaran | sved kampakhed datala sharira | jala virah to nenati itara vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
खेळी खेळता वो विकळ सुंदरा । जालि आठविता नंदाच्या कुमारां । स्वेद कंपखेद दाटला शरिरा । जाला विरह तो नेणती इतरा वो ॥१॥ धरा आवरुनी म्हणति वो साजणी । धीर न धरत पडिलि धरणी । येकी सांगति वो जालि झाडपणी । वेगीं आणा आतां पंचाक्षरी गुणीवो ॥२॥ जातो प्राण वो येताति लहरे । येकी म्हणति वो डंखिली विखारें । आंग तापलें वो येतु आसे शियारे । येकि म्हणति वो मोडसियेचा भरें वो ॥३॥ येकि म्हणति गे लागलें दैवत । कुळिचें दारुण वो नेदि करु मात । घाला गोंधळ वो विनवा समस्त । ठेवा आण भाक करुनि येकचित्त वो ॥४॥ ऐसा मिळाला वो भेंवताला पाळा । होती चुकुर येकी रडताती बाळा । पाजा वोखदें वो वांचवा वेल्हाळा । नका उशिर गे धांवा उतावेळा वो ॥५॥ मग ते येकांतिची सांगे सखियासी । नका बाहेरि वो फुटो कोणापाशीं । आणा नंदाचा नंदनु येकांतासी ।‍ निळया स्वामीची हे भावना निश्चयेसी वो ॥६॥