भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळे कान्हा यमुनेचे तटीं । राखितो गोधनें घेउनी हातीं काठी

khele kanha yamuneche tatin | rakhito godhanen gheuni hatin kathi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खेळे कान्हा यमुनेचे तटीं । राखितो गोधनें घेउनी हातीं काठी ॥१॥ पांघुरला घोंगडें रत्नजडित गे माये । नंदरायाचा खिल्लारी तो होय ॥२॥ गोप गोंधनें सवंगडे नानापरी । दहींभात काला वांटितो शिदोरी ॥३॥ एका जनार्दनीं खेळे नानापरी । वेधोनि नेलें मन नाठवे निर्धारी ॥४॥