भजनी मालिका
← भजनांकडे परत

खेळसी तुं लीळा । तुझी अनुपम्य काळा

khelasi tun lila | tujhi anupamya kala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
खेळसी तुं लीळा । तुझी अनुपम्य काळा ।१॥ बारवा बरवा श्रीमुकुंद । गाई गोपाळी लावला वेध ॥२॥ खेळसी बाळपनीं । बांधीताती तुज गौळणी ॥३॥ ऐसा नाटकी हरी । उभा ठेला विटेवरीं ॥४॥ विटे उभा समचरणीं । शरण एका जनार्दनीं ॥५॥