भजनी मालिका
← भजनांकडे परत

काया वाचा मन एकविध करी । पाहे तो श्राहरी पंढरीये

kaya vacha man ekavidh kari | pahe to shrahari pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काया वाचा मन एकविध करी । पाहे तो श्राहरी पंढरीये ॥१॥ ब्रह्मादिका जया ध्याती शिवादि वंदिती । ती विटेवरी मूर्ति पांडुरंग ॥२॥ वेद पै भागले शास्त्रें वेवादती । पुराणांसी भ्रांती अद्यापवरी ॥३॥ नेति नेति शब्दें श्रुति त्या राहिल्य । न कळे तयाला पार त्याचा ॥४॥ एका जनार्दनीं भक्तालागीं सोपा । भीमातटीं पाहें पां विठ्ठलासी ॥५॥