भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय याचे मुखीं बैसे दांतखीळ । नामोच्चारा बळ क्षीण होतें

kay yache mukhin baise dantakhil | namochchara bal kshin hoten

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय याचे मुखीं बैसे दांतखीळ । नामोच्चारा बळ क्षीण होतें ॥१॥ काय याचे कर्ण बधिर पैं वहिले । हरिकीर्तनीं जाहले पांगुळ ते ॥२॥ काय याचे नेत्रां अंधत्व तें आलेक । न देखती सांवळें रूप कधीं ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा तो चांडाळ । त्याचा मन विटाळ नको नको ॥४॥