भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय सुख आहे संसारीं । म्हणोनि भरलासी हावभरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशीं प्रपंचीं

kay sukh ahe sansarin | mhanoni bharalasi havabhari | vache smare shrihari | dinanishin prapanchin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय सुख आहे संसारीं । म्हणोनि भरलासी हावभरी । वाचे स्मरे श्रीहरी । दिननिशीं प्रपंचीं ॥१॥ जन्म जाहलीयापासोन । सदा संसाराचें ध्यान । नाहीं कधीं आठवण । न ये मुखीं रामनाम ॥२॥ ऐसा भार वाही खर । परितया न कळे साचार । आहे पुढें यातना अघोर । हें कांहीं नाठवीं ॥३॥ ऐसें होतां भरलें आयुष्य । मृत्युं पुन्हां येत जन्मास । ऐशा भोगी चौर्‍यांयशी निःशेष । एका जनार्दनीं म्हणे त्यास लाज नाहीं ॥४॥