भजनी मालिका
← भजनांकडे परत

करूनि नवस मागती ते पुत्र । परी तो अपवित्र होय पुढे

karuni navas magati te putra | pari to apavitra hoy pudhe

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करूनि नवस मागती ते पुत्र । परी तो अपवित्र होय पुढे ॥१॥ नासोनियां धर्म करी वेडेचार । भोगिती अघोर पापमती ॥२॥ सदा सर्वकाळ निंदावें सज्जन । काया वाचा मन परद्रव्या ॥३॥ परनारी देखतां सुख वाटे मनीं । भोगी वित्त हानी पाप जोडे ॥४॥ ऐसिया पामरा दंड तो कोण । तयाचे वदन कृष्णवर्ण ॥५॥ एका जनार्दनीं नवासाचें फळ । कुळीं झाला बाळ बुडवणा ॥६॥