भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुनी कीर्तन मागती जे द्रव्य । तें जाणावें वैधव्य विधवेचें

karuni kirtan magati je dravya | ten janaven vaidhavya vidhavechen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
करुनी कीर्तन मागती जे द्रव्य । तें जाणावें वैधव्य विधवेचें ॥१॥ सर्व अलंकार शरीर शोभलें । वायांपरी गेलें कुंकुहीन ॥२॥ मावनानें भावें करावें कीर्तन । आनंदे वर्तन वैष्णवांपुढें ॥३॥ एका जनार्दनीं कामनीक कीर्तन । करितां पतन जन्मोजन्मीं ॥४॥