भजनी मालिका
← भजनांकडे परत

करुनि चंद्रभागे स्नान । अभिवंदन पुंडलिका

karuni chandrabhage snan | abhivandan pundalika

रचनाकार: संत निळोबा · अभंग
करुनि चंद्रभागे स्नान । अभिवंदन पुंडलिका ॥१॥ पुजूं जाति विठोबासी । वैकुंटवासी ते होती ॥२॥ कथाश्रवण प्रदक्षणा । नाहीं गणना सुकृता त्या ॥३॥ निळा म्हणे पूर्वजेसी । होती विमानेंसी प्रविष्ट ॥४॥