भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्ता एक देव तेणें केलें सर्व । तयापासी गर्व कामा नये

karta ek dev tenen kelen sarva | tayapasi garva kama naye

रचनाकार: संत रामदास · अभंग
कर्ता एक देव तेणें केलें सर्व । तयापासी गर्व कामा नये ।। देह हें देवाचें वित्त कुबेराचें । तेथें या जीवाचें काय आहे देता देवविता नेता नेवविता ।कर्ता करविता जीवा नव्हे ।। निमित्ताचा धणी केला असे प्राणी ।पाहतां निर्वाणीं जीव कैचा ।। लक्षुमी देवाची सर्व सत्ता त्याची । त्याविण देवाची उरी नाहीं ।। दास म्हणे मना सावध असावें । दुश्चित नसावे सर्वकाळ ।।