भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्म उपासना न कळें जयांसी । तेणें संतांसी शरण जावें

karma upasana na kalen jayansi | tenen santansi sharan javen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कर्म उपासना न कळें जयांसी । तेणें संतांसी शरण जावें ॥१॥ सर्व कर्मभावें विठ्ठलनाम गावें । जाणिवेनेणिवेचें हावें पडुं नये ॥२॥ अभिमान झटा वेदांचा पसारा । शास्त्रांचा तो थारा वहातां अंगीं ॥३॥ एका जनार्दनीं सर्व कर्म पाही । विठ्ठल म्हणतां देहीं घडतसे ॥४॥