भजनी मालिका
← भजनांकडे परत

कर्म करतां काहीं न कळे विचार । परि द्वेषाद्वेष संचार होतां असे

karma karatan kahin na kale vichar | pari dveshadvesh sanchar hotan ase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
कर्म करतां काहीं न कळे विचार । परि द्वेषाद्वेष संचार होतां असे ॥१॥ राजस तामस सात्विक तें देखा । उपाधी ते देखा मूळ जाणा ॥२॥ यथाविधी कर्म न घडे निश्चयें । उणें पडतां जाय पतनासी ॥३॥ एका जनार्दनीं नाम मुखीं गातां । सर्व कर्में तत्त्वतां घडती सांग ॥४॥